स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक इतिहासाचे पाठ्याक्रमातील स्थान

             शालेय अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांचा समावेश  केकेला असतो. या विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये अपेक्षित बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. तो बदल घडविण्यासाठी प्रत्येक विषयाची वेगवेगळ्या प्रकारे भूमीका असल्याचे निदर्शनास येते. इतिहासाचेही इतर विषयाप्रमाणे कार्य आहे. इअतिहसच्य माध्यमातून नवनवीन घटना, प्रसंग विद्यार्थ्याना त्यांची अनुभूती देऊन त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवला जातो.  त्यामध्ये विविध स्तरानुसार इतिहासाच्या अध्यापनामध्ये बदल करण्यात येतो. प्राथमिक स्तरावर स्थानिक  इतिहास, प्रादेशिक इतिहास, माध्यमिक इतिहास स्तरावर प्रादेशिक व राष्ट्रीय व महाविद्यालयीन स्तवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संबंधाचा इतिहास विद्यार्थ्याना अभ्यासासाठी दिला जातो. त्या प्रकारची माहिती आपण पुढील प्रमाणे घेऊ.  

1. स्थानिक इतिहास 

विशिष्ट भागाच्या अगर स्थळाच्या  इतिहासास स्थानिक इतिहास म्हणतात.

या प्रकारात विशिष्ट निवडलेल्या स्थळांच्या उत्पत्ती सिद्धांसानुसार ते आज पर्यंत चा इतिहास मोडतो. अशा स्थळांचा इतिहास मनोरंजक व बोधप्रद असतो. 

उदा. जुन्नर, औंध , सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, पुणे. अशा स्थळांचा इतिहास हा स्थानिक इतिहास होय. स्थानिक इतिहासामुळे. विद्यार्थ्याना आपल्या परिचयातील आपल्या अनुभवातील विश्वातील अनेक गोष्टी चांगल्या प्रकारे कळू शकतात. म्हणून प्राथमिक स्तरावर स्थानिक इतिहास अनुभूती द्यावी लागते. 

फायदे 

1.. संबंधित स्थानिक विभागातील रूढी परंपरा समजतात.

२. ऐतिहासिक घटनामधील पूर्वजांचे योगदान समजल्यावर पूर्वजांविषयी आदर भाव निर्माण होतो. 

३. आपल्याला उज्वल भूतकाळ आहे. याची जाणीव होते.

४. भूतकाळाशी जवळचे नाते जोडले जाते. त्यामुळे भविष्यासाठी प्रेरणा मिळते. 

5. स्थानिक ऐतिहासिक वास्तू , किल्ले, संग्रालय. इ. भेट देणे शक्य होत असल्याने प्रत्यक्षात अनुभूती मिळते. 

६. स्थळांना भेट दिल्याने निरीक्षण क्षमता वाढते. 



  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

अभ्यासक्रमाचे स्वरूप