प्रादेशिक इतिहास

 जे देश विस्ताराने मोठे आहेत व ज्या देशात स्वयंपूर्ण असे प्रदेश आहेत. त्यांच्या बाबतीत प्रादेशिक इतिहास लिहीला जातो. आपल्या देशाचे उदाहरण घेतले तर, महाराष्ट्र उत्तरप्रदेश, गुजरात, कर्नाटक, इ. राज्य आहेत आणि या राज्यात पूर्वी ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. या प्रदेशाच्या इतिहासाला प्रादेशिक इतिहास म्हणतात.

या प्रकारात राज्यांचा स्वतंत्र इतिहास लिहिला जातो. त्या राज्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला जातो. प्रादेशिक इतिहासाला क्षेत्र त्या प्रदेशापुरतेच मर्यादित असते मात्र प्रादेशिक इतिहासला अवास्तव महत्व दिल्याने राष्ट्रीय एकात्मतेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता संभवते. 

अभ्यासक्रमात प्रथम सोप्या भाषेतील इतिहास द्यावा व त्यावर आधारित राष्ट्रीय इतिहासाची उभारणी  करावी.

भारतासारख्या खंडप्राय देशात प्रादेशिक इतिहासाची गरज आहे. मात्र इंग्लंड सारख्या छोट्या देशात प्रादेशिक व राष्ट्रीय असे दोन प्रकार करण्याची गरज नाही.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

अभ्यासक्रमाचे स्वरूप