समकेंद्री पद्धत

             पेस्टालॉजीच्या  तत्वावर आधारित हि पद्धती आहे. त्यांच्या मते इतिहासाच्या माध्यमातून समाजाची पुनर्रचना करणे शक्य आहे. रामराज्य आणायचे हे तत्व या पद्धतीवर आधारित आहे. या पद्धतीत प्रथम अभ्यासाचा गाभा निच्छित केल्या जातो. विद्यार्थ्याचे वय व आकलन क्षमता लक्षात घेऊन विषयाचे ज्ञान अधिक व्यापक केले जाते.व त्याबरोबर अभ्यासक्रमाचा अधिक विस्तार केला जातो. यात एक विशिष्ट बिंदू पासून एक लहान वर्तुळ रेखाटण्यात येते नंतर अधिक मोठे वर्तुळ रेखाटले जाते. 

       लहान वर्तुळ प्राथमिक स्तरासाठी नंतर माध्यमिक स्तरासाठी तर शेवटचे उच्च माध्यमिक स्तरासाठी 

उदा. 5,६,७, या वर्गात भारतात ब्रिटीश सत्ता कशी प्रस्थापित झाली हा इतिहास गोष्टी रूपाने किंवा कथाकथन पद्धतीने शिकवायचा 

मांडणी ढोबळ पण मनोरंजक पद्धतीने करायला हवी.

या पद्धती बाबत आधुनिक आराखडा पौल आर. हन्ना यांनी विकसित केला आहे. या पद्धतीच्या माध्यमातून प्राथमिक स्तरापासून ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत अभ्यासक्रमाची रचना कशी असावी या गोष्टी चे मार्गदर्शन या पद्धतीच्या माध्यमातून दिसून येते. 

गुण 

1) शिकण्याची प्रक्रिया निरंतर राहते. कोणत्याही प्रकारचा खंड पडत नाही.

२) मानस शास्त्रीय पध्दती आहे स्थूलाकडून सूक्ष्माकडे नेते.

३) आशयाची पुनरावृत्ती होत असल्यामुळे दृढीकरण होते. 

४) स्मरण करायला सोपी व अभिरुची निर्माण करणारी असते.

5) अभ्यासाचे विशेषीकरण करण्यासठी योग्य ते मार्गदर्शन मिळते. 

दोष 

1. पध्दत लवचिक पण पुनरावृत्ती हा दोष या पध्दतीत आहे. विषयांशी पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होत असल्यामुळे उत्साह, नाविन्यता टिकून राहत नाही. 

२. जातील किंवा कठीण भाग चांगल्या तर्हेने शिकविला जाऊ शकत नाही. 

३. विद्यार्थ्याच्या कुवतीनुसार योग्य पाठ्यपुस्तक लिहिता येत नाही.

४. विद्यार्थ्याला विषयाचे परिपूर्ण ज्ञान मिळत नाही. 

5. स्थळ व काळ या विषयी योग्य तो दृष्टीकोन विकसित होत नाही.

६. तोच तोच विषय येत असल्यामुळे अध्ययन व अध्यापन रुक्ष, निरस, व कंटाळवाणे होत जाते. विद्यार्थ्यांचं मन लागत नाही.    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

अभ्यासक्रमाचे स्वरूप