परावर्तन पद्धती

 वर्तमान काळातील प्रश्नांची उकल भूतकाळातील घटनांच्या आधारे केली जाणे परावर्तन होय. 

परावर्तन म्हणजे मागे वळून पाहणे होय. आजचा ज्वलंत प्रश्न घ्यायचा व या प्रश्नाची उत्पत्ती कशी झाली, भूतकाळात कोणते कोणते प्रसंग घडले, घटना घडल्या,कोणती राजकीय सत्ता बदल झाली याचा शोध या पद्धतीच्या माध्यमातून घेता येतो. 

महाराष्ट्र - कर्नाटक  सीमावाद, काश्मीर प्रश्न, हे प्रश्न अभ्यासासाठी घेऊन त्याचे उत्तर शोधण्यासठी भूतकाळातील विविध प्रसंग व घटनांचा आधार घ्यायचा. इतिहासातील कितीतरी घटनांचा अभ्यास या पद्धतीने करता येतो. बंगालची फाळणी, भारत - चीन युद्ध, कारगिल युद्ध अशा घटनांचा अभ्यास या पद्धतीने करता येतो. 

 इतिहास अध्यापनाच्या विविध उदिष्ट्यात भूतकाळाची जिज्ञासा व वर्तमान काळाची जाणीव निर्माण करणे या दोन उद्धीष्टांची पूर्ती आपल्याला या पद्धतीने करता येते. भूतकाळ व वर्तमान काळ यांची सांगड घातली जात असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाची रुची वाटते. व ते मनोरंजक देखील होतात. 

दोष 

1. या पद्धतीनुसार पाठ्यपुस्तक तयार करणे कठीण जाते. कारण अभाय्साक्रमाची मांडणी देखील सोपी नाही. 

२. या पद्धतीने अभ्यासक्रमाची मांडणी सुसंगतवार होत नाही. 

३. या पद्धतीत काळाचे भान ठेवले जाते पण त्याचा क्रम उलटा असतो.     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

GDCA कोर्सची संपूर्ण माहिती GDCA Course Information

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

SAP कोर्सची संपूर्ण माहिती SAP Course Information